पुणे शहरातील नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार समारंभ

पुणे : ’पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे जे स्वप्न पाहिले आहे त्यात महाराष्ट्राकडून एक ट्रिलियनचे योगदान अपेक्षित आहे. पंतप्रधानांच्या स्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्र भरीव योगदान देईल,’ असा विश्‍वास पणन व राजशिष्टाचार राज्य मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला.
    नवनियुक्त मंत्री, खासदार आणि पुणे शहरातील नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा-युवक कल्याण आणि अल्पसंख्याक मंत्री दत्तात्रय भरणे, नगर विकास राज्य मंत्री माधुरी मिसाळ, राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी, जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांचा सन्मान करण्यात आला. आमदार चेतन तुपे, आमदार हेमंत रासने, आमदार
भीमराव तापकीर यांचाही सन्मान करण्यात आला.
    रावल म्हणाले, अर्थव्यवस्थेचा व्यापरी हा कणा आहे. व्यापार्‍यांना सर्व स्तरावर पाठबळ दिले जाईल. परवान्यापासून वितरणापर्यंत सर्व व्यवस्था मजबूत करण्यात येतील.
    अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पारंपारिक कृषी क्षेत्र मोठा वाटा उचलत असताना शेतकरी मात्र विकासापासून वंचित राहतो.
त्यामुळे ग्राहकांपर्यंत माल पोहचत असताना होणारे नुकसान टाळण्यासाठीही यंत्रणा उभारण्यात येईल, असे रावल यांनी नमूद केले. यावेळी दि पूना मर्चेंट्स चेंबरचे अध्यक्ष रायकुमार नहार, दि पूना
मर्चेंट्स चेंबरचे उपाध्यक्ष अजित बोरा, राजेंद्र बाठिया, राजेश शहा, प्रवीण चोरबेले, ईश्‍वर नहार, नविन गोयल आणि विविध व्यापारी संघटनांचे पदाधिकारी तसेच प्रतिनिधी उपस्थित होते.
    सुहास धारणे यांनी सूत्रसंचालन केले. सहसचिव आशिष दुगड यांनी आभार मानले.