छत्रपती संभाजीनगर रोटरी महाएक्स्पो समाजोपयोगी मदतीचे नियोजन

उद्योगांसाठी छत्रपती संभाजीनगर ’रोल मॉडेल’
ललित गांधी : रोटरीच्या महाएक्स्पोला सुरवात, समाजोपयोगी मदतीचे नियोजन
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर हे उद्योगांसाठी रोल मॉडेल म्हणून पुढे येत आहे. 30-35 वर्षांपूर्वीचे आणि आताचे शहर यात खूप अंतर असून या शहराची भरभराट बघून मला आनंद झाला. रोटरी एक्स्पोद्वारे सर्वसामान्यांना पुढे न्यायचा, लघू उद्योजकांना घेऊन काम करण्याचा प्रयत्न अत्यंत स्तुत्य आहे. रोटरीचे व्हील तुम्हाला गतिमान ठेवते, असे विचार महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष
ललित गांधी यांनी व्यक्त केले.
    रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 च्या वतीने सेंट फ‘ान्सिस स्कूल मैदानावर आयोजित पाचव्या रोटरी महाएक्स्पोचे शुक‘वारी उद्घाटन झाले. रोटरीचे पब्लिक इमेज समन्वयक किशोर कुमार (कोइंबतूर), डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. सुरेश साबू, सुधीर लातुरे, जयेश पटेल व संयोजक सतीश लोणीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी रोटरी सदस्य सरिता लोणीकर, स्वाती स्मार्त, सुहास वैद्य आदी उपस्थित होते. ’रोटरीच्या एक्स्पोला जालना शहरात सुरवात झाली होती. पहिले  चारही एक्स्पो जालन्याला झाले’, असे सुरेश साबू म्हणाले. ’रोटरीने नैतिकता शिकवली. या सेवाभावातून रोटरीच्या एखाद्या डिस्ट्रिक्ट क्लबने महाएक्स्पो घेण्याची ही पहिलीच वेळ आहे’, असे किशोर कुमार म्हणाले. एक्स्पोद्वारे मिळालेल्या उत्पन्नातून ग‘ामीण भागातील स्मशानभूमीतील शेडची दुरुस्ती, शवदाहिनी उपलब्ध करून देणे आणि
ग‘ामीण भागातील 15 हजार मुलींची अ‍ॅनेमिया तपासणी केली जाईल, असे सतीश लोणीकर म्हणाले. एक्सपोमध्ये कंपन्या आणि व्यावसायिकांचे 175 हून अधिक स्टॉल्स आहेत.
    गृहोपयोगी वस्तू, सौरऊर्जेवरची उपकरणे,
ई-व्हेइकल, शेती व प्राण्यांसाठी जैविक उत्पादने, फर्निचर, फायनान्स यासह ज्वेलरी, कपडे, खाद्यपदार्थ, रोटरीच्या कार्याची माहिती देणारी दालने आदींचा समावेश आहे. याशिवाय सीपीआर ट्रेनिंग, अवयव दानाबद्दल जागृती, आंतरराष्ट्रीय खाद्यपदार्थ महोत्सव आणि दिव्यांग संस्था अनामप्रेम व आरंभ ऑटिझम सेंटरचे स्टॉल आहे