नववर्ष व प्रजसत्ताक दिनाच्या शुभेच्छा

नव्या वर्षातील नवा उत्साह, नवे सरकार, नव्याने मुलामा दिलेल्या आपल्या जुन्या अपेक्षा, सरकार स्थापनेची कासव गतीने झालेली प्रक्रिया या सर्वांच्या पार्श्व भूमीवर मुख्यमंत्री व उद्योग मंत्री यांच्या दाव्होस दौऱ्याकडे सर्वांचेच लक्ष होते. उद्योग मंत्र्यांनी गेली दोन वर्ष चढत्या क्रमाने नवीन गुंतवणुकीचे करार केले होते. नवीन मुख्य्यामंत्री दाव्होस ला निघताना जो आत्म विश्वास दिसत  होता. त्याबरोबरोबरच विक्रमी गुंतुवणुक  आणण्याचे केलेले सूतोवाच पाहता या वर्षी ५ लाख कोटींची नवीन गुंतवणूंक करता येईल असा अंदाज होता. मात्र प्रत्यक्षात मुख्य मंत्र्यांचे व्यवस्थापन कौशल्य व गाजावाजा न करता होत असलेली प्रचंड तयारी मुख्यमंत्री कार्यालय व उद्योग समूहाचे ऊर्जावाण तरुण अधिकाऱ्यांची टीम, उदयॊग मंत्र्यांचा सलग दोन वर्षांचा अनुभव यातून मुख्यमंत्र्यांची दाव्होस दौऱ्यासाठी प्रचंड मेहनत घेतल्याचे निकालावरून स्पष्ट होते .  दाव्होस हे आंतरराष्ट्रीय व्यासपीठ आहे . येथे येणाऱ्या उद्योजकांना जगाचे दरवाजे व त्यानांतर देशानंतर्गत विविध राज्यांचे दरवाजे खुले असतात . अशा ठिकाणी महाराष्ट्राला प्रभावीपणे सादर करून एवढी प्रचंड गुंतवणूक आणणे निश्चितच कौतुकास्पद ,गौरवास्पद व अभिमानस्पद आहे .