तळोजा इंडस्ट्रियल असोसिएशनच्या औद्योगिक प्रदर्शनाचे महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष नामदार ललित गांधी यांच्या हस्ते उदघाटन

तळोजा इंडस्ट्रियल असोसिएशनच्या औद्योगिक प्रदर्शनाचे महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष नामदार ललित गांधी यांच्या हस्ते उदघाटन
तळोजा इंडस्ट्रियल असोसिएशनतर्फे आयोजित दुसर्या औद्योगिक प्रदर्शनाचे उदघाटन जैन अल्पसंयाक वित्तीय विकास महामंडळाचे अध्यक्ष व महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष नामदार ललित गांधी यांच्या हस्ते मंगळवार दि. 7 जानेवारी 2025 रोजी झाले. याप्रसंगी नामदार व महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी तळोजा इंडस्ट्रियल एरीयातील उद्योजकांच्या विकासासाठी, त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आयोजित केलेले प्रदर्शन हा स्तुत्य उपकम आहे. या प्रदर्शनाचा निश्चितच स्थानिक उद्योसगांना फायदा होईल. तसेच या प्रदर्शनामुळे एमएसएमईला चालना देण्यास मदत मिळेल. हे प्रदर्शन संपूर्ण उद्योगात सुरक्षितता आणि शाश्वतता वाढवण्याच्या टीआयएच्या ध्येयाला जोडण्यासाठी, सहकार्य करण्यासाठी आणि प्रदर्शित करण्यासाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ असल्याचे ते म्हणाले.
याप्रसंगी तळोजा इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष
सतीश शेट्टी, महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष, नामदार ललित गांधी, उपाध्यक्ष श्रीकृष्ण परब उपस्थित होते. तळोजा इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष सतीश शेट्टी यांनी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष नामदार ललित गांधी यांचा
सन्मानचिन्ह व शाल देऊन सत्कार केला.